बाळा जो जो रे, बाळा जो जो रे
पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे !
झोपी गेल्या चिमण्या राघू
चिमण्या राजा नकोस जागू
हिरव्या पानावरी झोपली वेलींची लेकरे !
पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा, थांबव वाळा
वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे !
मेघ पांढरे उशास घेउनि
चंद्र-तारका निजल्या गगनी
शब्द ऐकते झोपेमधुनी चावळते वारे !
No comments:
Post a Comment