बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडिघडी ।
तशि नये फिरुन कधिं घडी ॥
किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी ।
परि दुबळी मानवकुडी । (चाल)
मनिं नव्हति कशाची चिंता ।
आनंद अखंडित होता ।
आक्रोश कारणापुरता ।
जें ब्रम्ह काय तें मायबाप ही जोडी ।
खेळांत काय ती गोडी ॥
No comments:
Post a Comment