बाळ गुणी तू कर अंगाई,Baal Guni Tu Kar Angai

बाळ गुणी तू कर अंगाई
जोजविते रे, तुजला आई !

तुझा चंदनी लाल पाळणा
जाईजुईचा मऊ बिछाना

झुलती वरती राघूमैना
मागेपुढती झोका जाई

बाळ गुणी तू कर अंगाई !

निजले तारे, निजले वारे
शांत झोपली रानपाखरे

जग भवतीचे निजले सारे
चंद्रहि करतो गाई गाई
बाळ गुणी तू कर अंगाई !

मंद पाऊली येते रजनी
शिणले डोळे जागजागुनी

अजुनी मिटेना कशी पापणी ?

निज, लडिवाळा, निज लवलाही
बाळ गुणी तू कर अंगाई !

No comments:

Post a Comment