प्रीतिचा पारिजात फुलला
सुगंध त्याचा तुझ्या नि माझ्या हृदयी दरवळला
पहिली ओळख, स्पर्शही पहिला
हर्ष तयाचा असे आगळा
हृदयवीणेवर आज कुणीतरी अनुरागची छेडिला
हळुच येउनी स्वप्नमंदिरी
वाजविता तू प्रीत-बासरी
स्वरास्वरांचा कैफ माझिया नयनांवर दाटला
नयनकडांवर लाज दाटता
अवघडले तुजकडे पाहता
कधी चुकुनी लोचन जुळता मन्मथ झंकारला
No comments:
Post a Comment