प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी
रुम झुम ओठांत येती लकेरी
माझ्या घरी मी आले फिरून
कणाकणांमधून रातराणी फुलून
मला मनोमनी वाटे
घर माझे ग, माझे
प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी !
हे माझे घर, जागे नवी भावना
ओढ लागे नवी गोड संवेदना
आज माझ्या मना स्वर्ग वाटे उणा
स्वर्ग माझा मला भेटला भूवरी
प्रीतफुले माझी सोनेरी सोनेरी !
ये चाहूल नवी, कोण ये जीवनी
कोण छेडीतसे ही नवी रागिणी ?
कंप गात्रांतुनी, गीत मौनातुनी
सूर झंकारती प्राणवीणेवरी !
प्रीतफुले माझी सोनेरी !
No comments:
Post a Comment