प्रथम तुज पाहता,Pratham Tuj Pahata

प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला

स्पर्ष होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटूनी तू घेतला

जाग धुंदीतूनी मजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबलाNo comments:

Post a Comment