प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया
विघ्नविनाशक , गुणिजन पालक, दुरीत तिमीर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रम्हांड नायका, विनायका प्रभूराया
सिद्धी विनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विश्वाधीशा, गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा साह्य करावे, हा भव सिंधू तराया
गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धी सिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया
No comments:
Post a Comment