प्रभू सोमनाथा,Prabhu Somanatha

मनी धन्य झाले, तुझे गीत गाता
प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा

तिथे प्राणनाथ, इथे देवराजा
दोन दैवतांची घडो नित्य पूजा
एक पाठिराखा, एक सौख्यदाता

मनी मानसी या, तुझी ओढ होती
तुझे नाम ओठी, तुझे रूप चित्ती
तेच भाग्य माझे, मिळे आज हाता

माहेरीचे सुख, सासरास आले
जीव शिव दोन्ही, एकरूप झाले
किती किती गावी, तुझी गोड गाथा

No comments:

Post a Comment