प्रभू मी तुझ्या करांतिल वीणा
आनंदाचे छेड सूर वा अश्रुजलाची करुणा
सात स्वरांच्या जोडुनि तारा
तूच घडविले या आकारा
तुझ्याच केवळ करस्पर्शाने फुलवी तूच तराणा
तुझ्या मनातिल दिव्य सुरावट
कुणि न जाणतो नशिबाचा पट
तव चरणांशी लीन होतसे रंक असो वा राणा
घे मजलाही तुझ्या पदासी
जन्म घालविन होउन दासी
तुझ्याच भजनी समरसताना मुक्ति मिळो या प्राणा
No comments:
Post a Comment