पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा
पतित पावन न होसी म्हणुनी जातो माघारा
घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार
काय देवा रोधु तुमचे कृपाणाचे द्वार
सोडी देवा ब्रिद आता न होसी अभिमानी
पतित नाम तुजला ठेवियले कोणी
हाति घेऊनी धांगड झेंडा फिरेन त्रैलोकी
पतित पावन नव्हेसी हरि तू अति मोठा घातकी
नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही
प्रेम असु द्या हृदयी तुमचे आठवण पायी
No comments:
Post a Comment