पतित तू पावना,Patit Tu Pavana

पतित तू पावना ।
म्हणविसी नारायणा ॥१॥

तरी सांभाळी वचन ।
ब्रीद वागविशी जाण ॥२॥


याति शुद्ध नाही भाव ।
दुष्ट आचरण स्वभाव ॥३॥

मुखी नाम नाही ।
कान्होपात्रा शरण पायी ॥४॥

No comments:

Post a Comment