परदेशी सजण घरी आले
देहताप सरले, सुखमय मी मंगल गीत म्हणाले
मोर जसा घनगर्जन श्रवुनी, तैसी उन्मन झाले
प्रभुमीलन होताच क्षाणी त्या सारे दु:ख गळाले
चंद्र बघुनि जशि फुले कुमुदिनी, तैसी फुलुनी गेले
नसानसात भरे शितलता, महालात हरि आले
सगळ्या भक्तांचे कैवारी तो प्रभुचरण मिळाले
मीरा विरहिणी शीतल झाली, द्वंद्वच पार निमाले
No comments:
Post a Comment