परब्रम्ह भेटी लागी,Parabramha Bheti Lagi,

परब्रम्ह भेटी लागी धरेवरी आले
सूर सूर चैतन्याचा रोमरोम झाले

वेद वेदनांचे गाती पुरे हा प्रवास
अगा आनंदाचे गाणे फुटे पहाटेस
चांदणे फुलांच्या फुलारून आले

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही
तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही
विश्व आत्मरूपी अवघे एकरूप झाले

No comments:

Post a Comment