पक्षिणी प्रभाति चारियासी,Pakshini Prabhati Chariyasi

पक्षिणी प्रभाति चारियासी जाये ।
पिलुवाट पाहे उपवासी ॥१॥

तैसे माझे मन धरी वो तुझी आस ।

चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥

तान्हे वस्त्र घरी बांधिलेस देवा ।
तया हृदयी ठावा माऊलीचा ॥३॥


नामा म्हणे देवा तू माझा सोयरा ।
झणि मज अव्हेरा अनाथ नाथा ॥४॥

3 comments:

  1. तान्हे वस्त्र ऐवजी तान्हे वत्स असे करावे.
    अव्हेरा म्हणजे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. अव्हेरा म्हणजे अव्हेरणे, नाकारणे. खरे वाक्य झणी मज न अव्हेरा अनाथ नाथा असे आहे.
      अनाथांच्या नाथा मला लगेच अव्हेरू नका, नाकारू नका.

      Delete
  2. तान्हे वत्सच असायला हव...प्रिंटींग चुक असेल 😋😊🤣🤣

    ReplyDelete