पाहिली काय वेलींनो,Pahili Kaay Velino

पाहिली काय वेलींनो तन्वंगी माझी सीता
देखिली काय वृक्षांनो शालीन धरेची दुहिता

हे ताल तरुंनो तुमची गगनाला शीर्षे भिडली
आकाशपथी ती तुमच्या दृष्टीस कशी ना पडली
उत्तुंग गिरींनो कोठे टेकिला सतीने माथा

मेघांनो तुम्हाही का वैदेही दिसली नाही
जाणीव पुण्यस्पर्षाची पवना तुज झाली नाही
बोलली नाही का काही ती व्योमपथाने जाता

निष्पाप आसवे कैसी झेलली फुलांनो नाही
हे विहंगमांनो सांगा तिजविषयी वार्ता काही

एकटा जटायु का रे साक्षीस त्रिभुवनी होता

1 comment:

  1. या गाण्याचा राग काेणता आहे?

    ReplyDelete