पाहतेच वाट तुझी जागवून रात रात
दाटतात आसवेच या उदास लोचनात
दाट दाट खिन्न तिमीर वाढवितो खिन्नताच
शेजेवर एकटीस स्मृति हळव्या टोचताच
मन वेडे होइ दंग भलभलत्या कल्पनात
शब्द मला देउनिया का विलंब लाविलास
कमलिनि ही आतुर रे भ्रमराला भेटण्यास
विरहाचे दंश सख्या, अंग अंग पोळतात
दु:ख असे दाहक जे एकटीच भोगतसे
लागलेच मजला रे विरहाने आज पिसे
नच रंगे सूरांविण प्रणयाचे गोड गीत
No comments:
Post a Comment