निळासावळा नाथ,Nila Savala Nath

निळासावळा नाथ, तशीही निळी सावळी रात
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात

तुडवूनि वन, धुंडुनी नंदनवन
शोधुनि झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात

नील जळी यमुनेच्या साची
होडि सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासांत

No comments:

Post a Comment