निळा समिंदर, निळीच नौका
निळे वरी आभाळ
निळी पैठणी, निळसर राणी
निळीच संध्याकाळ
बेतात राहू दे नावेचा वेग
रातीच्या पोटात चांदाची रेघ
डचमळ डुचमळ नकोच फार
नावेत नवखी गर्भार नार
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
नाजुक नारीला नकोच त्रास
कळीच्या झोळीत लपला सुवास
म्यानात राहू दे वाऱ्याची तेग
अलगद होऊ दे नौकेची चाल
धिमाच राहू दे वल्ह्याचा ताल
नकोस पाडू रे पाण्याला भेग
पल्याड दिसतिया खाडिची वेर
नाजुक नारीचे तिथे माहेर
आवर मायेचा नारी आवेग
No comments:
Post a Comment