निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू, सखा, बंधू, मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप
त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ, माया, मोह
त्याच्या संकीर्तनी मूरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
No comments:
Post a Comment