निळ्या नभातून नील,Nilya Nabhatun Neel

निळ्या नभातून नील चांदणे निथळे मार्गावरी
स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तव मंदिरी

पापण्यांच्या पडद्यामधुनी
तुझीच दिसते मूर्ती नयनी
मंद मंद या वाऱ्यावरुनी
स्वरवेलींची गोड ऐकु ये मादक तव बासरी

श्यामल कांती तुझी माधवा
स्वर्ग-सुखाचा ओठी पावा
अर्थ त्यातला मजला ठावा
वर्षव देवा या राधेवरि अमृत प्रीती-सरी

No comments:

Post a Comment