नशिब शिकंदर माझे,Nashib Shikandar Majhe

नशिब शिकंदर माझे, राज्यपद आले
पट्‌टराणी तुमची मी झाले, तुम्ही महाराजे

कोहिनूर हिऱ्यामधी हिरा,
फुलांमध्ये फूल मोगरा
लाखो राजांत राजेश्वरा
नवकोट मोत्यांचा तुरा मंदिली साजे

सोन्याचे कळस गोपुरी,
झळकती राज्यमंदिरी
स्वारी आली तुमची दरबारी
पंचखंडात होई ललकारी चौघडा वाजे


रत्नमण्यांच्या सिंहासनी,
तुम्ही इंद्र मी इंदायणी
कुबेरानं दिली खंडणी
देव उभे हात जोडुनी, मांडलिक राजे

No comments:

Post a Comment