बघुनि त्या भयंकर,Baghuni Tya Bahyankar

बघुनि त्या भयंकर भूता फोडिली तिनें किंकाळी ।
या हृदया चरका बसला, कळवले मनहि त्या काळीं ।
परि बाप तिचा तो कसला चांडाळ पूर्विचा वैरी ।
तिळभरही द्रवला नाहीं उलट त्या बिचारिस मारी ।
ती दीन भयाकुल मुद्रा रात्रंदिन दिसते बाई ।
रडविलें तिनें मज कितिदां दचकतें भिउनि शयनींही ॥

No comments:

Post a Comment