बघुन बघुन वाट तुझी नयन थांबले
परत निघुन जावया न वळति पाऊले
भिरभिरता तळि वारा
लुकलुकत्या वर तारा
क्षण क्षण मी गणत इथे स्तब्ध राहिले
भास तरी किति वेळा
सोडी ना मनचाळा
पदरव माज वाटे जरि पान वाजले
मनि येते रे नाथा
येशिल तू, मी जाता
सोसशील दु:ख कसे मज न सोसले
No comments:
Post a Comment