बघा तरी हो कशी,Bagha Tari Ho Kashi

बघा तरी हो कशी बांधिली जमवुन काडी काडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी ?

झोपडीस नाही दरवाजा आणि कडी-कोयंडा
बसायास हो कांबळ कुठली उशाला नसे धोंडा
आनंदाने तरिही मिळतो विश्रांती थोडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी ?

राजमहाली जाउन तिथला पाहिला पसारा
इमले माड्या हवेलीतला वेगळाच तो वारा
दुरुन साजरे दिसे परंतू त्यात नसे गोडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी ?

इथे जन्म घेई जो जो तो लावी जीवा जीव
आपसात नांदते प्रीतिची ममतेची जाणिव
दिन सौख्याचा म्हणून या इथे विधाता उजाडी
अशी कुणाची असेल का हो मजेदार झोपडी ?

No comments:

Post a Comment