त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी
पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी
अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही
नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी
रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतु
वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी
थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो
तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी
No comments:
Post a Comment