त्या गावी, त्या तिथवर, चल झरझर मना पुन्हा !
ती निरुंद पायवाट
वळत वळत जाय आत
ते शिवार, ती विहीर, पुढे एक लिंब जुना !
अजुन उभे त्या तिथेच
ते सखिचे घर तसेच
ते अंगण, ती तुळशी, त्या तिथल्या मधुर खुणा !
ते यौवन, ती प्रीती
ती ओळख, ती भीती
त्या शपथा, ती रुसणी, ते समेट क्षणाक्षणा !
रंगविले गोड सूख
तिथे उभे अजुनी मूक
अपुरे ते चित्र तिथे पुरे करील कल्पना !
No comments:
Post a Comment