त्या चित्त-चोरट्याला का आपुले म्हणू मी ?
स्मृतिजाल आसवांचे दिनरात का विणू मी ?
सहजी करी धरावे, नख लावुनी खुडावे
की फूल मालतीचे बागेतले जणू मी !
नजरेत नीट आले, मी घेतले निशाण
हलताच पापणीचा हुकला अमोघ बाण
ते मीन-केतनाचे ग मोडिले धनु मी !
आले मनात माझ्या, किति साळसूद बाई
मी पाहिले तरीही, ते पाहणार नाही
राजीवलोचनाला ग वाहिली तनू मी !
No comments:
Post a Comment