नको बावरूनि जाऊ,Nako Bavaruni Jau

एक एक पाउल उचली, चाल निश्चयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

पंख नाहि दिधले मनुजा जरि ईश्वराने
खंत काय धरिली त्याचि कधी मानवाने
अधांतरि उडति त्याच्या यशाचि विमाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

सूर्य चंद्र नसता गगनि काजळे धरित्री
प्रकाशास कोंडी मानव वीज काचपात्री

तारकास लाजविते ते दीप शामदाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

तुझ्या मागुति मी यावे असे स्वप्न होते
पुढे हो‍उनिया आता तुला हात देते
ऊठ चाल बघसि का रे असा विस्मयाने
नको बावरूनि जाऊ नियतीच्या भयाने !

No comments:

Post a Comment