नका विचारू देव कसा
देव असे हो भाव तसा
सगुण कुणी म्हणती देवाला
कोणी म्हणती निर्गुण त्याला
विश्वरूप त्या परमेशाचा,
चराचराचर असे ठसा
रंग फुलांचा दिसे लोचना
मूर्ती प्रभुची तोषवि नयना
दिसे कधी का कुणास सांगा
गंध फुलाचा मोहकसा
दर्पणास का रूप स्वत:चे
असती का आकार जलाचे
साक्षात्कार जसा तो दाखवि
दिसेल त्याला प्रभू तसा
No comments:
Post a Comment