दिवे लागले रे दिवे लागले
तमाच्या तळाशी दिवे लागले
दिठींच्या दिशा खोल तेजाळताना
कुणी जागले रे कुणी जागले
रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
असे झाड पैलाड पान्हावले
तिथे मोकळा मी मला हुंगिताना
उरी गंध कल्लोळुनी फाकले
उभ्या रोमरोमातुनी चैत्रवाटा
कुणी देहयात्रेत या गुंतले
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन्
उषासूक्त ओठांत ओथंबले
No comments:
Post a Comment