राम राम घ्या, दूर करा जी भवतीचा घोळका
दिलवरा, दिल माझे ओळखा !
( प्राण प्रियकरा, अरे दिलवरा, राजअंबिरा )
दिलवरा दिल माझे ओळखा !
बांधला बादली साफा जरी मी वरुन
रुळतात केस हे कुरळे भाळावरुन
बघताच तुम्हाला डोळे आले भरुन
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !
ही पैरण मेली चोळीहुन काचली
हलचाल कटीची शेल्याने जाचली
पाऊले महाली कशीबशी पोचली
सोंग घेतल्या कधी चांदणे बनेल हो जाळ का ?
दिलवरा दिल माझे ओळखा!
तुजसाठी दौड मी केली घोड्यावरुन
मर्दानी वेष हा दुनियेसाठी करुन
चोरूनि निघाले रात्री माझ्या घरून
एकांती मज घेई जवळी सख्या, असा वेळ का ?
दिलवरा दिल माझे ओळखा !
No comments:
Post a Comment