दिलवर माझा नाही आला
चांद चवथीचा मावळला
किती समजावू विकल मनाला
मन समजावी फिरुनी मजला
आणि घालुनी गळ्यांत गळा
अश्रुफुलांच्या गुंफित माळा
उभी लोचनी व्याकुळलेली
अधीरताही शिणली थकली
वाट बघुनिया नीज निजली
पापणीच्या पायतळाला
नयन कवाडे उघडी अजुनी
कशी घेउ मी बंद करुनी
त्रिभुवन धुंडुन नजरा परतुनि
येतिल जर का घेउन त्याला
No comments:
Post a Comment