देवापुडं मानूस पालापाचोळा,Devapudha Manus Pala

आरं आरं मानसा, तू येडा का खुळा रं ?
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

घडीभरी न्हाई कोनाचा भरोसा

तुला कोन देई मनाचा दिलासा ?
वाऱ्यावरी फिरतो हा जीव पांगळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रंसाऱ्या दुनियेचा देव जन्मदाता
आम्ही बनवितो त्यास भगवंता
देवाघरी मानसाचा न्याय आंधळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

मीठ-साखरेचं रूप जरी गोरं
एक होई गोड, एक होई खारं
दुधासंगं दोघांचा बी, धर्म येगळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

नको अभिमान, नको ही निराशा
जल्माचा जुगार, नशिबाचा फासा
हिम्मतीनं होई तुजा, मार्ग मोकळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

ऊस पिळीतो पिळीतो, रस गळीतो गळीतो
तहानल्या जीवा तुला, गारवा मिळीतो
म्हनू नको शिक्शा ही, सत्याची परक्शा ही

अमृताचं रूप घेई, रस पिवळा रं
देवापुडं मानूस पालापाचोळा रं

No comments:

Post a Comment