देश हा देव असे माझा,Desh Ha Dev Ase Majha

देश हा देव असे माझा
अशी घडावी माझ्याहातुन तेजोमय पूजा

चंदन व्हावा देहच केवळ
भाव फुलांची भरुनी ओंजळ
प्राणज्योतिने ओवाळिन मी देवांचा राजा

धन्य अशा या समर्पणाने
या जन्माचे होइल सोने
मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजाNo comments:

Post a Comment