तुला ते आठवेल का सारे ?
दवात भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे
तुझ्या करातिल मोरपीस ते
अजून गालांवरुनी फिरते
बनातुनी केतकिच्या येती सुगंध शिंपित वारे
त्या तरुवेली, तो सुमपरिमळ
झऱ्यातली चांदीची झुळझुळ
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे ?
ते सारे मी हृदयी जपते
उगिच लाजते, उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे ?
No comments:
Post a Comment