तुजहून लाजरे हे, बोलावयास लाजे
हे फूल लाजवंती सांगेल गूज माझे
होकार दे तयाला नाही म्हणू नको ग
नको ग, फुलाची शपथ,
तुला या फुलाची शपथ
तू तो धनी धनाचा, मी एक दीन दासी
का जोडीसी जीवांसी अपमान आपदासी
एका अकिंचनेला भलते पुसू नको रे
नको रे, फुलाची शपथ
तुला या फुलाची शपथ
मानून स्वामिनी हे तुज फूल वाहिले मी
पाहून साहसा या भ्याले शहारले मी
माझी न योग्यता ती, मज उंचवू नको रे
नको रे, फुलाची शपथ
तुला या फुलाची शपथ
No comments:
Post a Comment