तुला बघुन पदर माझा पडतो
डोळ्याचा पारवा उडतो
शालू हिरवा फुलांचा साज
तुझ्यासाठी केला मी आज
आली वयात पहिली लाज
रंग गुलाबी गाली चढतो
अडविता प्रीतिने वाटा
गोऱ्या अंगि कोवळा काटा
जाता गळून मनाचा ताठा
रूप गुणाचा उजेड पडतो
तुझ्या नयनाचा घेऊन ऐना
आली जीवाची हासत मैना
नाचता बांधुनी पैंना
देहाचा मोर बाई डुलतो
No comments:
Post a Comment