तुझ्या मनात कुणितरी लपलं,Tujhya Manat Kunitari Lapala

तुझ्या मनात कुणितरी लपलं ग
किती जरी आजवर जपलं ग

कधी न दिला डोळ्याला डोळा
स्वभाव अगदी साधा भोळा
कसा सुचावा भलता चाळा
परि दैव खुदुखुदु हसलं ग

कसा धरावा सखे भरवसा
पळे न कुठवर बाई ग ससा
प्रीत पारधी येईल सहसा
कसं अचुक सावज फसलं ग

मदन दूत पिटतील डांगोरा
मनोगते ही सांगती चोरा
मनमोरा नाचसी माजोरा
कुणी नव्हेच बाई अपलं ग

तेच नाव ओठांवर यावे
तेच बोल कानात घुमावे
तेच रूप नयनांत भरावे
ते गुपित आम्हाला कळलं ग

No comments:

Post a Comment