ऐन वयात आलेली मी रे नाजूक छबी, आले बाजारा एकली
सांगलीच्या पेठंत बाजाराच्या वाटंत काय होतं घाटंत तुझ्या मनी ?
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
मोठी कलदार नाण्यांची ओतली
नथ मोत्यांची विकत घेतली
गोऱ्या नाकात झोकात घातली
आपुल्याच तोऱ्यात चालता मी बाऱ्यात काय आलं होऱ्यात तुझ्या मनी ?
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
साऱ्या चिंचांचा सौदा करून
हारा माथी मी घेतला भरून
घरी निघाले लगबग करून
संग संग चालायचं काही नाही बोलायचं हेतू होता हमखास तुझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
आली बोरंची पाणंद थोडी
दोन्ही बाजूनी दाटली झाडी
तुझ्या डोळ्यात चमचम बेडी
चालताना मागून हात तुझा लागून वीज गेली जागून माझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
काही ओळख पाळख नसून
मी रे उगाच हसून
थोडं लटकं लटकं रुसुन
पुढं पुढं चालायचं काही नाही बोलायचं हेतू होता हमखास माझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी
No comments:
Post a Comment