तुझी रे उलटी सारी,Tujhi Re Ulati Sari

तुझी रे उलटी सारी तऱ्हा
सौंदर्याची दौलत टाकुन जासी भलत्या घरा

राजमंदिरी असंख्य नारी
रूपवती त्या अतुल सुंदरी
तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा

शोभे का हे तुला माधवा
गालबोट हे तुझिया नावा
सोडुनि दे ती कुब्जा काळी सोडुन दे श्रीधरा

हात जोडिते पदर पसरिते
तुजविण जीवन उदास गमते

तुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा

No comments:

Post a Comment