तुझं नि माझं जमेना
परि माझ्यावाचुन करमेना
आवड तुजला भांडायाची
तूहि शोधिसी संधी त्याची
कैसे होइल जीवन सुखकर, जोवर तव ही रीती
हेच सुखाचे साधन सखये, तरुणांच्या संसारी
मानशील का तू मज राणी ?
होईन राजा मीहि त्याक्षणी
तू राजा, मी राणी जोवरी, कोण कुणाचा धनी ?
केव्हा मी तव स्वामी, केव्हा तू माझी स्वामिनी
गाण्याची mp3 file Post kara
ReplyDelete