तू नजरेने 'हो' म्हटले, पण वाचेने वदणार कधी ?
कर पडलेत गळ्यांत तुझे, पण वरमाला पडणार कधी ?
तुझे हासरे हृदय आठवित, दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम ग, होणार कधी ?
तू नसताना तुझी आठवण, मना जाळिते पदोपदी
एक विचारू तुला ?
काय ?
होणार कधी ग सप्तपदी
No comments:
Post a Comment