तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे
विरहात रात्र मोठी, प्रेमी जनांस वाटे
शब्दात सांगु कैसे, ते दुःख अंतरीचे
ओलावले दवांत, हे काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे
मी भाबडी मनाची, आहेच स्वप्नवेडी
विरुनी तुझ्यात जावे, ही एक आस वेडी
राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते
भाळावरी असे हे, सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता, दोघे तयास जिंकू
फुलता मनात आशा, ओठांत गीत येते
No comments:
Post a Comment