तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा !
तपोवनातून तुझ्या उजळली, उपनिषदांची वाणी
मातीमधुनी तुझ्या जन्मल्या, नररत्नांच्या खाणी
जय युग धैर्याच्या देशा, जय नव सूर्याच्या देशा
बळापुढेवा छळापुढे, नच इथे वाकल्या माना
अन्यायाला भरे कापरे, बघुनी शूर अभिमाना
जय आत्मशक्तीच्या देशा,
जय त्यागभक्तीच्या देशा
श्रमातुनी पिकलेली शेते, पहा डोलती धुंद
घामाच्या थेंबातून सांडे, हृदयातील आनंद
जय हरितक्रांतीच्या देशा, जय विश्वशांतीच्या देशा
पहा झोपड्या कंगालांच्या थरथरत्या भवताली
अन्यायाला जाळीत उठल्या, झळकत लाख मशाली
जय लोक शक्तीच्या देशा. जय दलितमुक्तीच्या देशा
No comments:
Post a Comment