तू असतीस तर झाले असते,Tu Asatis Tar Jhale Asate

तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे


बकुळिच्या पुष्पापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
अन्‌ रंगांनी केले असते
क्षितिजावरले खिन्न रितेपण

पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदुशामल मखमल
अन्‌ शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसून मिश्किल

तू असतीस तर झाले असते
आहे त्याहुनी जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते

गगन धरेतील धूसर अंतर

1 comment: