लहर धुंद सागरी नजर धुंद लाजरी
नाचतो निसर्ग हा - तू उदास का ?
हवेत मंद गारवा
दिशादिशांत गोडवा
स्वप्नरम्य या क्षणी तुझाच ध्यास का ?
बोल ना, तू उदास का ?
नभात रंग खेळती
हळूच मेघ बोलती
आज या चराचरी तुझाच भास का ?
बोल ना, तू उदास का ?
फुलून प्रीत राहिली
प्रिया तुलाच वाहिली
या प्रसन्न एकांती तू निराश का ?
असं रे काय, तू उदास का ?
No comments:
Post a Comment