तू असता तर कधि नयनांनी,Tu Asta Tar Kadhi Nayanani

तू असता तर, कधि नयनांनी
अश्रु ढाळले नसते झरझर

तू असता तर देवा पुढती
शरणांगत मी झाले नसते
म्हटले नसते अगतिक होऊन
करुणाकर तू या दीनेवर

तू असता तर मायपित्यांचे
छत्र कृपेचे ढळले नसते
होऊन दुबळी, अनाथ अशी ही
पडले नसते मी उघड्यावर

तू असता तर प्रीत तुझीही
दुःखद झाली नसती कधीही
रडते तीही, रडते मीही
काय करु मी तू नसल्यावर ?

No comments:

Post a Comment