तुझा गे नितनूतन सहवास !
तुझेच चिंतन करितो अनुदिन
एक तुझा मज ध्यास !
या प्राणांच्या क्षितिजावरती
भाग्यवती तू उषा उमलती
मम हृदयीच्या विरहतमाचा
करसी सहज निरास !
किती करावी प्रिये प्रतिक्षा ?
प्रणायांधाला का ही शिक्षा ?
दिशांदिशातुन अवकाशातुन
तुझे मधुर आभास !
No comments:
Post a Comment