त्रिभुवन पालक रघुवीर Tribhuvan Palak Raghuveer

त्रिभुवन पालक रघुवीर तो स्वामि अयोध्येचा


वनवासी तुम्हि आज पोरके, पिता असुन तुमचा

कुणि रजकाने मला निंदिले सहजी गमतीत


अग्निशुद्ध मी असुन त्यागिले मजला रानात


गर्भवती मी केवळ जगले विचार येता तुमचा

तुम्हा मुखीचे हास्य पाहुनी विसरले मी दु:ख


बोल बोबडे ऐकुन वाटे स्वर्गीचे सौख्य


पतीपारख्या स्त्रीला केवळ अधार पुत्रांचा

घ्या बाळांनो शिकून विद्या आणि धनुर्वेद


राज्य पृथ्विचे जिंका देते आई आशीर्वाद


आशीर्वाद कधि होइ न खोटा सती जानकीचा

No comments:

Post a Comment