चल नाच नाच रे नंदकिशोरा,Chal Nach Nach Re

चल नाच नाच रे नंदकिशोरा
सूर मुरलिचा घुमव जरा

रुमझुम रुमझुम पैंजण वाजति
तालावरती गोपी नाचति
सुर स्वर्गातुनी कौतुक पाहति
आनंदाचा दिवस खरा

जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मध्ये थबकला
कोकीळ गाई न गायनाला
काय जादु ही मुरलीधरा

No comments:

Post a Comment